Home राजकारण हसन मुश्रीफांकडून बेरोजगारांना अर्थसहाय्य

हसन मुश्रीफांकडून बेरोजगारांना अर्थसहाय्य

10 second read
0
0
1,047

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण झाले. केडीसीसी बँकेकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अर्थसाहाय्यातून रोजगार वाढून बेरोजगारांचे संसार फुलले, अशा भावना बेरोजगार युवक-युवतींनी व्यक्त केल्या. केडीसीसी बँक सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर आहे. मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अण्णासाहेब पाटील योजनेमधून प्रकरणे सुरू आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना आर्थिक स्थैर्य देवून व्यवसायाभिमुख करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे योगदान मोठे आहे. मराठा समाजासह इतर मागासवर्ग समाजासाठीही उद्योग, व्यवसाय व रोजगारवाढीच्या दृष्टीने तरुणांनी केडीसीसी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज मंजूर झालेल्याची नावे अशी…..

अजित राजाराम चिखले-रा.रणदिवेवाडी,मिलिंद रघुनाथ कोकणे-रा.बामणी,अंजना धोंडीराम पाटील-रा.म्हाकवे, प्रवीण गणपती पाटील-रा.म्हाकवे,संजय कल्लाप्पा मगदूम-रा.मौजे सांगाव, भैरवनाथ परशराम सावंत- रा.मळगे बुद्रुक, बाबुराव हरिभाऊ मेंगाने – रा.मळगे बुद्रुक, सागर प्रकाश संकपाळ – रा. रणदिवेवाडी, अक्षय भैरू पाटील -रा. निढोरी.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…