कसबा बावडा: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांची युरोपमधील युरीझोन (EURIZON) फेलोशिप कार्यक्रमासाठी बाह्य तज्ञ समीक्षक म्हणून निवड झाली आहे. युद्धामुळे अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या युक्रेनियन संशोधकांसाठी रिमोट रिसर्च ग्रँट्स प्रदान करण्यावर हा प्रकल्प लक्ष केंद्रित करतो.या प्रकल्पाद्वारे युक्रेनियन संशोधकांना त्यांचे संशोधन अखंडपणे सुरू ठेवण्यास, संशोधनासाठी लागणाऱ्या …