गुगल क्रोम आणि मोझिलामध्ये अनेक धोकादायक बग्स आढळून आले आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून, भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम आणि मोझिला चालवणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना , या दोन्ही वेब ब्राउझरच्या नवीनतम आवृत्त्या डाउनलोड आणि अपडेट करण्याची सूचना दिली आहे. इतकंच नाही तर वापरकर्त्यांना क्रोम ब्राउझरची नवीनतम आवृत्ती गुगलवरून डाउनलोड करण्याचा सल्ला देखील देण्यात आला …