कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे कागल, दि. १४:कागल एज्युकेशन सोसायटीने जी. एन. एम. हा अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या शिक्षण संस्थेने विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांबरोबरच कागलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करू, असेही ते म्हणाले. कागलमध्ये वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्यावतीने नव्याने सुरू केलेल्या …