Home वायरल हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…

हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…

4 second read
0
2
1,272

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खाजगी साखर कारखान्याच्या शेअर्स कथित अपहार प्रकरणी ईडीने छापे टाकले होते. याप्रकरणी आपल्याला अटक होईल या शक्यतेने हसन मुश्रीफ यांनी सेशन न्यायालयात अटकपूर्वक जमिनीसाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. यामुळे संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच गडहिंग्लज साखर कारखाना चालविण्यास घेतलेल्या ब्रिस्क कंपनीच्या कथित गैर व्यवहार प्रकरणी मनी लॉन्ड्रीग झाल्याचा संशय वाढला आहे. याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर या आधीच ईडी व इन्कम टॅक्स आदी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकून तपासणी केली आहे. यासंदर्भातील अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी हसन मुश्रीफ यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला होता . त्याचा राखून ठेवलेला निर्णय न्यायमूर्ती देशपांडे यांनी आज देताना हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…