Home Kolhapur मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सर्व धर्मीयांना मागेल ते मिळाले निडसोशी मठाचे उत्तराधिकारी देवरु महास्वामीजी यांचे गौरवोद्गार

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सर्व धर्मीयांना मागेल ते मिळाले निडसोशी मठाचे उत्तराधिकारी देवरु महास्वामीजी यांचे गौरवोद्गार

4 second read
0
0
417

गडहिंग्लज, दि. ३: मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व धर्मीयांना पाठबळ देण्याचे पवित्र कार्य सदैव मनापासून केले आहे. त्यांनी सर्व धर्मीयांना मागील ते दिले आहे, असे गौरवोद्गार निडसोशीच्या मठाचे उत्तराधिकारी देवरु महास्वामीजी यांनी काढले.

गडहिंग्लमधील लिंगायत समाजाच्या जडेयसिद्धेश्वर आश्रमाला त्यांनी नेहमीच पाठबळ दिली आहे. त्यामुळेच या आश्रमामध्ये आधी महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा, ध्यानमंदिर आणि आत्ता पवित्र अशी रुद्र भूमी साकारत आहे, असेही श्री. महास्वामीजी पुढे म्हणाले. गडहिंग्लजमधील लिंगायत समाजाच्या जडेय सिद्धेश्वर आश्रमामध्ये आयोजित मंत्री मुश्रीफ यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मुश्रीफ यांनी आश्रमाला आतापर्यंत दिलेला सव्वा कोटीचा निधी, मंत्रिमंडळात झालेली निवड आणि महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा, याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आश्रमाच्यावतीने केले होते.

मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहरासह तालुक्यात लिंगायत समाज मोठा आहे. सीमाभागासह कर्नाटकातूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या आश्रमाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच येथे डिजिटल लायब्ररी उभारण्यासाठीही प्रयत्नशील आहे.

गडहिंग्लजमधील बेलबाग आश्रमाचे अधिपती बसवकिरण महास्वामीजी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हातून होत असलेली ही लोककल्याणाची कामे ही काही निव्वळ त्यांच्याकडे पद आहे म्हणून होत नाहीत. यामागे निश्चितच एक विधायक शक्ती आहे. त्यांच्या योगदानातूनच या आश्रमामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा, श्रद्धेय ध्यान मंदिर निर्माण झाले आहे. तसेच आत्ता पवित्र अशी रुद्रभूमी साकारली जात आहे. सर्वच धर्मीयांनी त्यांच्याकडे जे मागितले ते मिळाले आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, महात्मा बसवेश्वर स्वामीजी हे थोर क्रांतिकारक होते. गडहिंग्लजमधील बेलबाग येथील जडेय सिद्धेश्वर आश्रम हे गडहिंग्लजसह कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. येथील माता-भगिनी॔च्या निरपेक्ष कामामुळे मी प्रभावित झालो, असेही ते म्हणाले.

रुद्रभूमीसाठी जागा देणगी दिल्याबद्दल सावित्री सागर हिरेमठ व डॉ. श्लोक हिरेमठ यांचे सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. तसेच; डॉ. एम. एस. बेळगुदरी, शिवसेना तालुकाप्रमुख संजय संकपाळ, इंजिनीयर रौनक हंजी, इंजिनियर अक्षय हत्ती, बसवराज आजरी, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब झोंड, सुरेश मोरबाळे यांचेही सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाले.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…