Home टेकनॉलॉजि Chrome आणि Firefox वरील कोट्यावधी युझर्सचा डेटा धोक्यात?

Chrome आणि Firefox वरील कोट्यावधी युझर्सचा डेटा धोक्यात?

4 second read
0
0
33

गुगल क्रोम आणि मोझिलामध्ये अनेक धोकादायक बग्स आढळून आले आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून, भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम आणि मोझिला चालवणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना , या दोन्ही वेब ब्राउझरच्या नवीनतम आवृत्त्या डाउनलोड आणि अपडेट करण्याची सूचना दिली आहे. इतकंच नाही तर वापरकर्त्यांना क्रोम ब्राउझरची नवीनतम आवृत्ती गुगलवरून डाउनलोड करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.भारतासह संपूर्ण जगाला इंटरनेटचं वेड लागलं आहे. अशी मोजकीच लोक असतील जी इंटरनेटचा वापर करत नाहीत. मोबाईल असो किंवा लॅपटॉप , इंटरनेट सर्फिंगसाठी गुगल क्रोम आणि मोझिलाचा सर्वाधिक वापर केला जातो. अँड्रॉईड स्मार्टफोन गुगलच्या ओएसवर काम करतात आणि अशा परिस्थितीत या दोन्ही कंपन्यांकडे करोडो लोकांचा डेटा आहे. जर तुम्हीही यापैकी कोणतेही वेब ब्राउझर वापरत असाल तर तुमचा वैयक्तिक डेटा धोक्यात आहे.

सीईआरटी- इन ने एक चेतावणी जारी केली आहे की जर तुम्ही यापैकी कोणतेही वेब ब्राउझर वापरत असाल तर तुमचा वैयक्तिक डेटा हॅक होऊ शकतो. या दोन्ही वेब ब्राउझरमध्ये काही धोकादायक बग्स आढळले आहेत आणि या बग्सच्या मदतीने हॅकर ग्रुप गुगल क्रोम आणि मोझिला चालवणाऱ्या लोकांचा डेटा ऍक्सेस करू शकतात. सीईआरटी-इन या बग्सना हाई रिस्कवर मार्क केले आहे. म्हणजेच डेटा चोरी आणि हॅकिंगचा धोका उद्भवू शकतो. गुगल क्रोमबाबत असे सांगण्यात आले आहे की , ऑपरेटिंग सिस्टम ९६.०.४६६४.२०९ च्या आधीच्या या वेब ब्राउझरच्या सर्व आवृत्त्या या धोक्याच्या कक्षेत येतात. त्याचप्रमाणे, मोझिला फायरफॉक्स आईओएस १०१ आणि मोज़िला फायरफॉक्स थंडरबर्ड ९१.१० च्या आधीच्या सर्व आवृत्त्या देखील हॅकर्सच्या श्रेणीत येतात. तुम्ही वापरत असलेले क्रोम ब्राउझर किंवा मोझिला फायरफॉक्स या आवृत्त्यांपेक्षा पूर्वीचे असल्यास, तुम्ही ते ताबडतोब नवीनतम आवृत्तीवर अपडेट केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…