Home Kolhapur डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

4 second read
0
0
416

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी रिसर्च सेंटरच्यावतीने नुकतीच संशोधक विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. दक्षिण कोरियामधील डोंगगुक विद्यापीठाचे प्रा. जे. जे. ली व इनहा विद्यापीठाचे डॉ. दीपक पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी डोंगगुक विद्यापीठाशी सामजस्य करार करण्यात आला.

प्रा. जे.जे.ली यांनी प्रकाशऊर्जाची साठवणूक व त्याचे रूपांतर या क्षेत्राविषयी नाविन्यपूर्ण माहिती सांगितली. त्याचबरोबर कृत्रिम प्रकाश प्रणालीवरील नवनवीन संशोधनाचा तंत्रज्ञानामध्ये वापर कसा केला जातो याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. दीपक पाटील यांनी नाविन्यपूर्ण अशा चुंबकीय ऊर्जाचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतराबाबत चर्चा केली. चर्चासत्राचे आयोजन व प्रास्ताविक डॉ. विश्वजीत खोत यांनी केले.

यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर व डोंगगुक विद्यापीठ, दक्षिण कोरिया यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करण्यात आला. यापूर्वी २०१८ मध्ये असा करार करण्यात आला होता. अनेक संशोधक विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्याचा फायदा झाला आहे. यापुढे देखील हा सामंजस्य करार सुरु राहावा या दृष्टिकोनातून हा करार करण्यात येत आहे अशी माहिती डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे यांनी दिली. या करारामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन प्रकल्प, संशोधनासाठी लागणारे विविध उपकरणांचा वापर तसेच विद्यार्थी देवाण-घेवाण या माध्यमातून दक्षिण कोरिया येथे संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत.

सदर चर्चासत्र व करारासाठी संस्थेचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…