Home राजकारण बंटी पाटील तुम्ही शब्द मोडायला नको होता – विनय कोरे यांचा विधान परिषदेबाबत मोठा गौप्यफोस्ट

बंटी पाटील तुम्ही शब्द मोडायला नको होता – विनय कोरे यांचा विधान परिषदेबाबत मोठा गौप्यफोस्ट

3 second read
0
0
386

राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागला आहे. हातकणंगले तालुक्यातील कुंभमेळा गावात सत्ताधारी सहकार आघाडीची सभा झाली. या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय गोरे, खाजदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमर महाडिक याच बरोबर जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित होते.

आमदार विनय कोरे यांनी बोलताना आपला संपूर्ण राजकीय प्रवास सांगितला त्याच बरोबर आपण सहकार आघाडी सोबत का? आलो याचा खुलासा करताना कोरे म्हणाले विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यावेळी माझ्या घरात मी नामदार चंद्रकांत दादा पाटील, उद्योगपती संजय पाटील आणि बंटी पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत संजय पाटील आणि बंटी पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्यास आम्ही राजाराम कारखाना बिनविरोध करू असा शब्द मला दिला होता. त्यानुसार मी माझी आमदार महादेवराव महाडिक आणि अमोल महाडिक यांना विनंती केली. आणि माझ्या विनंतीला मान देत विधानपरिषद निवडणूक बिनविरोध केली. बंटी पाटील आमदार झाले त्यानंतर मंत्री झाले आणि नैतिकता विसरले. राजाराम कारखाना सभासद अपात्रता प्रकरणाच्या वेळी मी त्यांना त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली होती. पण दुर्दैवाने बंटी पाटीलांची शब्द फिरवण्याची कृती समोर आली. त्यांनी विश्वासघात करून राजाराम कारखान्याची निवड सभासदांवर लागली आहे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…