Home राजकारण बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट, स्वाभिमानी, शिंदे गट व राष्ट्रवादी बंडखोर एकत्र येणार ?

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट, स्वाभिमानी, शिंदे गट व राष्ट्रवादी बंडखोर एकत्र येणार ?

4 second read
0
0
983

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधी पडेल उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी आघाडीचे नेतृत्व स्वाभिमानीचे राजू शेट्टी व सत्यजित पाटील यांनी करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विरोधी आघाडीत शिवसेना ठाकरे गटाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर असलण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या संचालकांच्या 18 जागांच्या निवडणुकीसाठी 660 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत उमेदवारी अर्ज यांची संख्या लक्षात घेता यामध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज होणाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे या नाराजीचा लाभ उठवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रस्थापितांच्या विरोधात आघाडी करण्याची भूमिका घेतली. राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधी आघाडी स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची सत्यजित पाटील-सरूडकर यांच्याशी चर्चा करून विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे अशी विनंती केली यावेळी सरूडकर यांनी एकटे लढण्यापेक्षा जे येतील त्या सर्वांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना चांगला पर्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…