Home वायरल कोल्हापूर जिल्ह्यात १ ते १३ मेपर्यंत बंदी आदेश लागू…..

कोल्हापूर जिल्ह्यात १ ते १३ मेपर्यंत बंदी आदेश लागू…..

3 second read
0
1
10,387

कोल्हापूर जिल्ह्यात दोन धर्मात मध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे १ ते १३ मे दरम्यान जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शहरातील शाहपुरी, लक्ष्मीपुरी व जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन धर्मात तेढ व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू राहील. या काळात शारीरिक इजा होईल असे शस्त्र, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, उपकरणे हाताळण्यावर बंदी असेल. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमा होणे, मिरवणूक काढणे व सभा घेणे यावर बंदी असेल पण हा आदेश कर्तव्यावरील शासकीय अधिकारी, कर्मचारी, जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रांना तसेच लग्न इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा प्रेतयात्रा यांना लागू नसेल.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…