Home राजकारण मा.श्री. विश्वासराव नारायण पाटील चेअरमनसो कारकीर्द

मा.श्री. विश्वासराव नारायण पाटील चेअरमनसो कारकीर्द

20 second read
0
0
569

चेअरमनपदाची कारकिर्द संकल्पपूर्तीची ! दूध उत्पादकांना न्याय देणारी !

जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तांतरानंतरचे दुसरे वर्ष हे संकल्पपूर्तीचे आणि सर्वच घटकांमध्ये संघाप्रती विश्वास वृद्धीगंत करणारे ठरले आहे.दोन वर्षापूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नेते मंडळींनी चेअरमनपदाची धुरा माझ्याकडे सोपविली. या माझ्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीला आज दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षात राबविलेल्या सभासदहिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार यासंबंधी मांडणी करणे गरजेचे आहे. आमदार हसन मुश्रीफसो, आमदार सतेज पाटीलसो ,आघाडीचे सर्व नेते यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, कर्मचारी व प्रसिद्धी माध्यमे यांच्या योगदानाने ‘गोकुळ’ ची दिमाखात वाटचाल सुरु आहे याचा मला मनस्वी आनंद आहे.

दोन वर्षाच्या कालवधीमधील संघाच्या कामकाजातील ठळक बाबी

· दोन वर्षाच्या कालवधी मध्ये संघाची वार्षिक उलाढाल २५५० कोटी वरून ३४२० कोटी रुपये इतकी झाली असून या मध्ये ८७० कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे.·

दोन वर्षातच्या कालावधीत दूध उत्पाकांना दूध खरेदी सात वेळा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली. यामध्ये म्हैस दुधासाठी १० रुपये व गाय दुधासाठी ११ रुपये दरवाढ करण्यात आली.

· म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम राबिवण्यात आला आहे. म्हैस खरेदीसाठी दूध संघ, केडीसीसी बँक व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत अनुदान योजना सुरू केली आहे.

· जातिवंत म्हैस खरेदी अनुदानामध्ये ५००० इतकी वाढ करण्यात आली.

· मुंबई वाशी शाखा विस्तारीकरण करण्यात आले.

· नवीन पेट्रोल पंपास मान्यता

· सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मेडिकल ग्रेड ऑक्सीजन प्‍लॅन्ट सुरू केला.

· भारतीय नौदल सेना (नेव्ही) कारवार यांना सिलेक्‍ट (यु.एच.टी) टेट्रापॅक दुधाचा पुरवठा

· ग्राहकांच्या मागणीनुसार गोकुळ बासुंदी, सुगंधीत दूध(फ्लेवर मिल्‍क) हे स्‍ट्रॉबेरी, पिस्‍ता, व्‍हेनीला व चॉकलेट या चार प्रकारांमध्‍ये उत्पादित केलेले आहे, तसेच नॉर्मल टेंपरेचरला १८० दिवस टिकून राहणारे नवीन टेट्रापॅक मधील मँगो,व्‍हेनिला लस्सी व मसाला ताक ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे. हे नवीन उत्पादन चालू केले आहे

· NDDB च्या सहकार्याने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत,बायोगॅस प्लॅान्‍ट , व फिरती मिल्किंग मशीन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहेत.

· दूध उत्पादकांच्या बळावर प्रतिदिन वीस लाख लिटर संकलनाचा संकल्‍प लवकरच पूर्ण करू.

· महालक्ष्मी पशुखाद्य मार्फत जनावराचे ताणतणाव कमी करणेसाठी व दुधाची गुणप्रत वाढविण्यासाठी स्ट्रेसनील खाद्य पुरकाची निर्मीती केली. व जनावराची गाभण तक्रार निवारण्यासाठी फर्टीलिटी फीड खाद्याची निर्मीती करण्‍यात आली आहे.

· “लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत (गोकुळ) १ लाख १० हजार ४५४ जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले.

· जनावराच्या भाकड काळ कमी होण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम गर्भ प्रत्यारोपण (I V F) ही संकल्पना राबवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…