Home Uncategorized प्रवीण प्रभावळकर यांची भाजप तर्फे शाहुवाडी-पन्हाळा मतदारसंघ प्रमुख पदी नियुक्ती

प्रवीण प्रभावळकर यांची भाजप तर्फे शाहुवाडी-पन्हाळा मतदारसंघ प्रमुख पदी नियुक्ती

5 second read
0
1
608

मलकापूर प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण राज्यात लोकसभा, विधानसभा जिंकण्यासाठी मायक्रोप्लॅनिंग ने काम सुरू झाले असून, यामध्ये महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील 105 विद्यमान आमदार व 183 मतदार संघात विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी- पन्हाळा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी तर्फे प्रवीण उर्फ राजू प्रभावळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भारतीय जनता पार्टीचे मलकापूर नगरपरिषद मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य म्हणून शाहूवाडी व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडले आहे.

सध्या प्रभावळकर यांच्याकडे शाहुवाडी- पन्हाळा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.या जबाबदारीमध्ये प्रथम जी जबाबदारी असेल ती म्हणजे, विधानसभा व लोकसभा मतदारसंघात असलेल्या उमेदवाराला विजयी करण्याची. अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये शाहूवाडी – पन्हाळा तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांना बरोबर घेऊन संपूर्ण तालुक्यातील लोकांपर्यंत केंद्रातील व राज्यातील शासकीय योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी, मुख्यमंत्री आरोग्य योजने अंतर्गत रुग्णाला मदत मिळवून देणे अशा जबाबदारी देण्यात आल्या आहेत.

लोकसभा व विधानसभा यासाठी गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर जिल्हा व प्रामुख्याने शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात एस. पी. सिंह बघेल केंद्रीय विधी व न्याय मंत्री यांचा दोन वेळा दौरा झाला असून, त्याचबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा तीन वेळा दौरा झाला आहे. लोकसभा, विधानसभा या अनुषंगाने केंद्रीय मंत्री सडक परिवहन आणि राजमार्ग नितीन गडकरी यांचा दौरा झालेला आहे.सध्याचे भाजपचे मंत्री हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्ते यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी दौऱ्याचे आयोजन करत आहेत. या सर्व अनुषंगाने शाहूवाडी, पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रवीण उर्फ राजू प्रभावळकर हे येत्या विधानसभेचे जबाबदारी कशा पद्धतीने पेलणार हे महत्त्वाचे राहील.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …