Home Uncategorized आंबा घाटात गायमुख मंदिरावर दरड कोसळली

आंबा घाटात गायमुख मंदिरावर दरड कोसळली

2 second read
0
0
223

मलकापूर प्रतिनिधी

आंबा: येथील घाटातील गायमुख मंदिरावर दरड कोसळून मंदिराची हानी झाली. गणेश मंदिर दर्शनासाठी नेहमी प्रवाशांची व पर्यटकांची वर्दळ असते पण रात्रीची दरड पडल्याने कोणतेही जीवीत हानी झाली नाही.

मंदिराचा वरील भाग व तिन्ही बाजूंच्या भिंती कोसळल्या. विशेष म्हणजे गायमुखावरील गणेशाची मुर्ती मात्र जशीच्या तशी राहीली. सन २००१ मध्ये तत्कालीन मंत्री रविंद्र माने यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.

आंबा घाटातील बारमाही पाणी मिळणारे हे एकमेव ठिकाण. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील या घाटाचा ये जा करणार्या वाहनधारक व प्रवाश्यांना या पाणवठ्याचा आधार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …