Home राजकारण विकासात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवून कोल्हापूरच्या विकासासाठी नेत्यांनी असेच एकत्र यावे

विकासात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवून कोल्हापूरच्या विकासासाठी नेत्यांनी असेच एकत्र यावे

4 second read
0
0
208

कोल्हापूर: कोल्हापूरसाठी महाडिक पाटील वाद हा काही वेगळं नाही मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी काल महाडिक आणि पाटील एका सोफ्यावर खांद्याला खांदा लावून बसलेले दिसून आले. काल उद्योग मंत्री माननीय उदय सामंत कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक व आमदार ऋतुराज पाटील हे फायर ब्रँड नेते एकत्र आले होते. त्यामुळे हा विषय जिल्ह्यातील चर्चेचा विषय बनला. जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय भूमिका बाजूला सारून व्यासपीठावर एकत्रित आलेल्या या दोन्ही नेत्यांचे उदय सामंत यांनी कौतुक केले. कोल्हापूरच्या विकासासाठी एखाद्या प्रश्नावर महाडिक पाटील यांनी अशा पद्धतीने एकत्रित येऊन जर काम केलं तर कोणताही प्रश्न मार्गी लागण्यास विलंब लागणार नाही. अशा प्रकारच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसून येत आहेत. आपले पक्षीय मतभेद बाजूला सारून कोल्हापूरची विकासात्मक भूमिका केंद्रस्थानी ठेवून जर महाडिक आणि पाटील एकत्रित येऊन काम करत असतील तर कोल्हापूरकर यांचे स्वागतच करतील यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…