Home Uncategorized अंगणवाडी सेविकांची बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोक्सो कायदा याबाबत जागर प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा संप्पन्न

अंगणवाडी सेविकांची बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोक्सो कायदा याबाबत जागर प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा संप्पन्न

2 second read
0
0
76

अवनी संस्था गेली 29 वर्षे मुलांच्या अधिकारावर कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था आहे. मार्च 2021 पासून महानायक अमिताभ बच्चनजी यांच्या निधीतून अवनी संस्थेमार्फत बालविवाह विरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवनी संस्थे अंतर्गत जागर बालविवाह रोखण्यासाठी चा प्रकल्प सुरू केला आहे.

या प्रकल्प अंतर्गत कळे बीट क्र. 2 सुळे बीटस्तरीय अंगणवाडी सेविकांची बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोक्सो कायदा याबाबत जागर प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा झाली. या वेळी सौ.आर.एम.मुल्लाणी. कळे पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. या कार्यशाळेमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा पोक्सो कायदा याबाबत मार्गदर्शन करताना बालविवाह होणार असेल तर कोणत्या यंत्रणांना कळवले पाहिजे याबाबत माहिती देण्यात येऊन शंका व प्रश्नाचे निरसन केले. कार्यशाळेमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे माहितीपत्रकाचे वाटप केले ही कार्यशाळा अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सतिश पाटील यांनी या कार्यशाळेचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी प्रकल्प समन्वयक अनिकेत कदम, अंगणवाडी सेविका अर्चना पाटील, सुनीता मांगले, छाया चौगुले, उषा पोतदार यांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…