Home शेती ई-पीक पाहणी योजनेचा लाभ घ्यावा: शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

ई-पीक पाहणी योजनेचा लाभ घ्यावा: शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

6 second read
0
0
638

शिरोळ: प्रतिनिधी

राज्य शासनाकडून शेती पिकाची अचूक नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर ई-पीक पाहणी हा उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शिरोळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनि घेऊन महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी केले.

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण यांच्या निवासस्थानी मोबाइलद्वारे ई-पीक पाहणी उपक्रम संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी मान्यवरांचे स्वागत करून सदर उपक्रम शेतकऱ्यांसाठी लाभदायक असून या उपक्रमात सहभाग होण्याचे आव्हान केले. शिरोळ मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी उपक्रमा संदर्भात माहिती देऊन मोबाइलद्वारे ई-पीक पाहणी व लाभ या संदर्भात माहिती दिली. शिरोळचे तलाठी संभाजी घाटगे यांनी मोबाइलद्वारे अँप डाऊनलोड करणे व ई-पीक पाहणी संदर्भात प्रात्यक्षिक सादर केले.

यावेळी कोतवाल धोंडीराम धामणे, संजय चव्हाण, कृष्णराव मोरे, नगरसेवक पंडित काळे, धनाजी नरदेकर, रामचंद्र पाटील, बाळासाहेब कोळी, बापू गंगधर, रवींद्र कोळी, उदय संकपाळ, गुरुदत्त देसाई, दगडू चव्हाण, प्रकाश पाटील, बॉबी संकपाळ आदींसह शिरोळ परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…