Home शेती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केली हसुरच्या जलस्वराज्य प्रकल्पाची पाहणी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केली हसुरच्या जलस्वराज्य प्रकल्पाची पाहणी

6 second read
0
0
897

शिरोळ: प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील हसुर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी भेट देऊन जिल्ह्यातील अद्ययावत अशा जलस्वराज्य प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.

हसुरसारख्या छोट्याश्या गावात गेल्या १५ वर्षांपासून जलस्वराज्य प्रकल्प सुरू करण्यात आला असून एकूण ५८४ नळ कनेक्शनधारक आहेत. सर्व नळाला मीटर बसविण्यात आल्यामुळे पाण्याचा वापर अंत्यत काटकसरीने केला जातो. त्यामुळे पाण्याची बचत होते. पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सर्व सोयी-सुविधा पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी समाधान व्यक्त केले. जलस्वराज्य प्रकल्पाद्वारे शुद्ध होणारे पाण्याची चवदेखील घेतली. ग्रामपंचायतीचे कौतुक करून इतरांनी आशा सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, सुषमा देसाई, गटविकास अधिकारी शंकर कवीतके, पाणीपुरवठा अधिकारी कुंभार, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर,सरपंच सुनीता चौगुले,उपसरपंच अभिजीत पाटील, जलस्वराज्यचे अध्यक्ष एम.एस.पाटील, ग्रामसेवक अण्णासाहेब कुंभार यासह गावातील सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…