Home Uncategorized बिद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गट नंबर 3 व 4 मधील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा

बिद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गट नंबर 3 व 4 मधील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा

5 second read
0
0
97

श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि.बिद्री, ता.कागल पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गट नं.3 व 4 मधील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा बिद्री येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हमिदवाडा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून कारखाना आणि सभासदांचे हीत जोपासले आहे. याच पद्धतीवर बिद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून सभासदांचे आणि कारखान्याचा हिताचे अनेक निर्णय आम्ही घेणार होतो मात्र चेअरमन के.पी.पाटील यांनी स्वार्थासाठी ही निवडणूक लावली आहे. सभासद आता के.पी.पाटलांच्या हुकूमशाहीला कंटाळले असून निश्चितच या निवडणुकीत सभासद आमच्या आघाडीला निवडून देतील असा विश्वास यांनी यावेळी केला.बिद्री साखर कारखान्यात विजयाचा घट बसवण्याचा संकल्प करूया आणि खोटे बोल पण रेटून बोल या चेअरमन के.पी.पाटलांच्या प्रवृत्तीला कारखान्यातून हद्दपार करूय असे आवाहन यावेळी उपस्थित सभासदांना केले. तसेच बिद्री साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी अजूनही इथेनॉल प्रकल्पाला परवानगी घेतली नाही. हुकूमशाही पद्धतीने चाललेला हा कारभार थांबून कारखाना आणि सभासदांच्या हितासाठी आमच्या आघाडीला पाठिंबा असे आव्हान केले.

यावेळी जेष्ठनेते मारुतीराव जाधव गुरूजी, कोकण केसरी के.जी.नांदेकर साहेब, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे, बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले, बाजार समितीचे माजी कल्याणराव निकम, अरुणराव जाधव, अशोक फराकटे, बाजीराव गोधडे, मदनदादा देसाई, सत्यजीत पाटील, विजयराव बलुगडे, अशोकराव वारके, सुभाष पाटील-मालवेकर, नंदकुमार पाटील, अमर पाटील, शहाजी गायकवाड यांच्यासह प्रमुख मान्यवर व ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…