Home गोकुळ ‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

31 second read
0
0
291

               

सत्‍कारप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश  पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संघाचे अधिकारी व कर्मचारी

कोल्‍हापूरःता.१६. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) बाचणी, ता.कागल यांचा थायलंड येथे झालेल्या आशियाई महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी केलेबद्द्ल तसेच पशुवैद्यकीय डॉक्टर संजय डोंगळे घोटवडे, ता.राधानगरी यांचा लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोटवडे व पंचक्रोशीत उत्कृष्ट सेवा दिलेबद्दल व अमर पाटील (फौजी) करंजफेण, ता.पन्हाळा यांचा वाघाबॉर्डर (अमृतसर) येथे सैन्यदलातील बी.एस.एफ. मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प,गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि, ग्रामीण भागातील व्यक्ती  आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवत असून जिल्ह्याचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करत आहेत. अशा व्यक्तींना नेहमीच प्रेरणा देण्याचे काम गोकुळने केले आहे. सर्व सत्कारमूर्तींची कामगिरी ही कौतुकास्‍पद आहे त्यांच्या भावी वाटचालीस संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.  

यावेळी सत्कारला उत्तर देताना अजित पाटील(सर) म्हणाले कि, “गोकुळने नेहमीच जिल्ह्यातील  खेळाडूंना व क्रीडाक्षेत्रास प्रोत्साहन दिले आहे असे उद्गागार त्यांनी याप्रसंगी काढले. यानंतर अमर पाटील (फौजी) म्हणाले कि महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य आणि माझ्या कोल्हापूर भूमितील गोकुळ दुध संघात होणारा माझा सत्कार हा माझ्यासाठी अभिमानास्पद असे मनोगत व्यक्त केले.   

 यावेळी अंबाबाई महिला सहकारी दूध संस्था सावर्डे खुर्द,ता. कागल  या संस्थेचे दूध उत्पादक पांडुरंग कदम यांचा आदर्श दुध उत्पादक म्हणून गोकुळ संघामार्फत सत्‍कार करणेत आला. त्यांनी स्वतः घरी मुऱ्हा जातीच्या १५ म्हैशी तयार केल्या आहेत. त्याचे प्रतिदिनी १०० लिटर दूध संकलन करून संघास पाठवतात. एक यशस्वी दूध उत्पादक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर,किसन चौगले,  नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील,राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

                                      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…