Home Uncategorized गोकुळचा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक  – अरुण डोंगळे

गोकुळचा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक  – अरुण डोंगळे

24 second read
0
0
130

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय/म्हैस दुधाला चांगली मागणी होती त्यामुळे मागणी जास्त व  पुरवठा कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे उत्पादकांना दुधाला चांगला खरेदी दर देता आला. त्याबरोबरच बटर व दूध पावडरीचे दरही वाढत राहिले होते. परिणामी गेल्या दोन वर्षात प्रतिलिटर १० ते ११ रुपयांची दूध दरवाढ करण्यात आली. या परिस्थितीमुळे गाय खरेदी करण्यावर दूध उत्पादकांनी भर दिला. यातून गाय दुधाचे उत्पन्न वाढले आहे. यापूर्वी गाय दुधास ३५ रुपये प्रतिलिटर्स  दर दिला जात होता.

           गेल्या दोन महिन्यांत बाजारपेठेतील गाय दूध पावडर, लोणी यांचे दर खूपच कमी झाले आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये गाय लोणी दर प्रति किलो ४५०/- रुपये होता तो आज ऑक्टोबर २०२३ मध्ये ३५०/- रुपये प्रति किलो इतका झाला आहे. तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये गाय दूध भुकटीचा दर २८०/- रुपये प्रति किलो असा होता तो ऑक्टोबर २०२३ मध्ये २४०/- रुपये प्रतिकिलो असा आहे. सरासरी पाहता गाय लोणी व गाय दूध भुकटीचे दर प्रतिकिलो ५० ते १०० रुपयांनी कमी झाले आहेत. 

          त्या अनुषंगाने गोकुळने तसेच इतर सर्वच दूध संघांनी (अमूलसह) ऑक्टोबर२०२३ मध्ये गाय दूध खरेदी दरात कपात केली असून सध्या प्रतिलिटर ३१ ते ३३ रुपये इतका दर दिला जात   आहे. त्या अनुषंगाने काही ठिकाणी आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवरती गाय दूध खरेदी दर कपातीबाबतची खरी परिस्थिती आंदोलनकर्त्यां दूध उत्पादकांनी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

          गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचा विचार केला आहे. दूध उत्पादक हेच संघाचे मालक आहेत गाय दूध दर कमी करण्याचा निर्णय हा नाईलास्तव घेण्यात आला आहे. कारण कोणतीही संस्था ही ताळेबंदावरती अवलंबून असते त्यामुळे भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊन चालत नाही. दुग्धव्यवसायाच्या बाजारपेठचा अभ्यास करून त्याची चर्चा व विचार करून दराबाबतचे किंवा इतर धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात.

 ग्राहकांकडून गोकुळच्या म्हैस दूधालाच जास्त मागणी असून त्या तुलनेत गाय दुधाला मागणी कमी आहे. म्हणूनच म्हैस दूधाचा मागणीच्या तुलनेत पुरवठा व्हावा या हेतूने म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हैस दूध खरेदी दारात वाढ केलेली आहे. 

          गोकुळ दूध संघ नेहमीच दुग्ध व्यवसाय अधिक किफायतशीर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाराचा मानबिंदू असणाऱ्या गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. म्हणून गोकुळ दुध संघ महाराष्ट्रातील सहकारी संस्थाचा मानदंड बनला आहे. हाच विश्वास शेतकऱ्याच्या मनात रुजला आहे. दूध उत्पादक व ग्राहक यांच्यात समन्वय साधून दूध दराचा समतोल राखणे हाच उद्देश गोकुळ दूध संघासमोर नेहमी असतो. ‘गोकुळ’ने सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्रस्थानी ठेवून वाटचाल सुरु ठेवली आहे. गोकुळमध्ये नेहमीच काटकसरीचा कारभार करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये जादा मोबदला मिळावा हीच आमची भूमिका राहिली आहे. गोकुळच्या संचालिका सौ.शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन गाय दूध खरेदी दर कपाती बाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. सर्वांचाच आधारवड असलेला हा गोकुळ दूध संघ वाढला पाहिजे,यासाठी वस्तुस्थिती समजावून घेण्याची गरज आहे असे आवाहन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…