Home Uncategorized निनाई मंदिर येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला

निनाई मंदिर येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला

3 second read
0
0
36

मलकापूर प्रतिनिधी:

शाहुवाडी तालुक्यातील येळाने येथील निनाई मंदिर या ठिकाणी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त हळदी – कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राम जप, देवाची आरती, आयोध्या येथील राम मंदिरातून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन असा कार्यक्रम पार पडला.

निनाई देवस्थान मंडळामार्फत, तिळगुळ वाटप व १०० महिलांना वाण वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा वेळी निनाई मंदिराचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, भाजप जिल्हा सदस्य महिपती पाटील, प्रकाश पाटील, सदा पाटील, किरण पाटील, मनोहर सावंत व सर्व भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …