Home Uncategorized कोल्हापुरात शाहू छत्रपती यांच्या विरोधात कोण लढेल…? कोणाच्या नावाची शक्यता..??

कोल्हापुरात शाहू छत्रपती यांच्या विरोधात कोण लढेल…? कोणाच्या नावाची शक्यता..??

2 second read
0
1
1,718

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर मतदारसंघांमध्ये 2024 च्या निवडणुकांसाठी शाहू छत्रपती यांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जवळजवळ त्यांची उमेदवारी निश्चितच झाल्याचे दिसून येते परंतु येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू छत्रपती यांच्याविरुद्ध कोणाला उमेदवारी मिळेल?? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चितच मांडली जात आहे; परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. सध्याचे निवडणुकीचे संपूर्ण चित्र पाहता संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महायुतीचे संजय मंडलिक आपल्या मतदारसंघात सर्वत्र संपर्क दौरे सुरू केल्याने, त्यांची उमेदवारी ग्राह्य धरली जात आहे. सध्या तरी सर्वत्र महायुतीचे संजय मंडलिक यांच्याविरुद्ध शाहू छत्रपती यांची उमेदवारी असेल असे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

मागील निवडणुकांमध्ये ठाकरे गटाने कोल्हापूरला दोन खासदार दिले, पण दोन्ही खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने, सध्या शिवसेनेचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकही आमदार दिसत नाही; परंतु येत्या निवडणूकांमध्ये शिवसेनेकडून संजय घाडगे, चेतन नरके, विजय देवणे यांची नावे पुढे येण्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याचे स्पष्ट संकेत आले नसल्याने उमेदवारी कोणाला मिळेल हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…