Home Uncategorized जोतिबाला दवणा फक्त केखलेचा

जोतिबाला दवणा फक्त केखलेचा

4 second read
0
1
45

प्रतिनिधी:

महाराष्ट्रात जोतिबा देव फार प्राचीन काळापासून अध्यात्मिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. कर्नाटक ,आंध्रप्रदेश अनेक पर राज्यातील भाविक भेट देतात. इथली चैत्र यात्रा, षष्टी यात्रा, खेटे, आणि पाकाळण्या ना लाखो भाविक येतात. पण सर्व यात्रामध्ये जोतिबा देवाच्या आवडीचे फुल म्हणजे दवणा.पण हा दवणा मिळण्याचे एकमेव गाव म्हणजे केखले. विशेष करून या गावातील बरेच लोक शेतकरी दवणा पिक घेतात. जवळजवळ १० एक्कर शेती केली असून तरुण वर्ग ही या औषधी सुगंधी जोतिबाला बाहण्यासाठी दवनाकडे वळत आहेत. सध्या जोतिबा खेटे सुरु असून रविवारी व इतर दिवशी दवना विक्रीसाठी इथले लोक जोतिबावर जातात.याबाबत येथील काही शेतकऱ्यांनी दवण्यास अध्यात्माची, औषधाची जोड दिली. कित्येक वर्षापासून इथे उत्पदान सुरु असून कधीच खंड पडलेला नाही.

KK न्यूज साठी राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …