Home स्पोर्ट्स सैनिक टाकळीच्या अनिकेत सुतार याची दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्समध्ये धावणे या स्पर्धेत सिल्वर कामगिरी

सैनिक टाकळीच्या अनिकेत सुतार याची दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्समध्ये धावणे या स्पर्धेत सिल्वर कामगिरी

5 second read
0
0
46

नामदेव निर्मळे : विशेष प्रतिनिधी :

जुलै व २४ जुलै २०२२ या दिवशी दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्स येथे पार पडल्या. यामध्ये शिरोळ तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून लौकिक असणाऱ्या सैनिक टाकळीचा धावपटू अनिकेत संजय सुतार यांनी सिल्वर मेडल मिळवून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचं नाव लौकिक केले आहे. नॅशनल युथ गेम्स मध्ये अनिकेतने २०० मीटर धावणे या  खेळात द्वितीय क्रमांक प्राप्त करून  सिल्वर कामगिरी केली आहे.
       अनिकेत सध्या देवचंद कॉलेज निपाणी, तालुका :-चिकोडी जिल्हा:- बेळगाव येथे बी.कॉम.भाग -२ या वर्गात शिक्षण घेत आहे. मुळात अनिकेचे वडील संजय सुतार हे सैनिक टाकळी गावामध्ये सुतार काम करीत असून आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. अशा बिकट परिस्थितीत आई वडिलांनी दिलेली साथ व गुरुवर्यांनी दिलेले प्रशिक्षण या जोरावर त्यांनी सुयश संपादन केले आहे.
   तो लहानपणापासून धावण्याचा सराव करत असतो.आता त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून देशाचं नाव उज्ज्वल करावयाचे आहे. त्या दृष्टिकोनातून तो कसून सराव करत आहे.


   अनिकेतला प्रशिक्षक रियाज मीरा खान सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अनिकेत शिक्षण घेत घेत बाहेर पार्ट टाइम काम सुद्धा करत आहे.व त्यातूनच वेळेत वेळ काढून धावण्याचा सराव जिद्दीने करत आहे.त्याच्या या सिल्वर कामगिरीने सैनिक टाकळीसह शिरोळ तालुक्यात अभिनंदनचा  वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…