Home Uncategorized शिरटीत ग्रामदैवत भेरैश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यावरून दोन गटात धुसफूस….

शिरटीत ग्रामदैवत भेरैश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यावरून दोन गटात धुसफूस….

2 second read
0
0
902

बेकायदेशीर जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्षाची निवड रद्द करण्याची मागणी…

शिरोळ / प्रतिनिधी

शिरटी ता. शिरोळ येथे ग्रामदैवत श्री भैरैश्वर यात्रेच्या विषयावरून गेल्या महिन्याभरापासून दोन गटात अंतर्गत धुसमुस सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या बैठकीत पोलिसांच्या समोरच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता. अखेर गावात शांतता राखण्याच्या उद्देशाने तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जुन्या यात्रा कमिटीने माघार घेऊन विरोधी गटाला यात्रा व कलशारोहन सोहळा साजरा करण्यास समंती दिली. मात्र विरोधी नूतन यात्रा कमिटीने श्री भैरैश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीर समिती स्थापन केली. तसेच कलशारोहण सोहळा दिनांक २४ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान संपन्न होणार असल्याचे पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले. दरम्यान, जीर्णोद्धार समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांना ही बाब समजल्यानंतर गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार समितीने कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भैरेश्वर मंदिराच्या स्वयंघोषीत कलशारोहण समितीच्या अध्यक्षाची निवड रद्द करावी, अशी मागणी तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  
 निवेदनात म्हटले आहे की, गावातील सर्व नागरिकांनी मिळून, ग्रामदैवत भैरेश्वराचे प्रशस्त मंदिर बांधण्याचे ठरवून जीर्णोद्धार समिती स्थापन केली आहे. मंदिराचे सुरुवातीपासूनचे बांधकाम लोकवर्गणीतून केले आहे. एकरी २ हजार रुपयांप्रमाणे वर्गणी गोळा केली असून सध्या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. मात्र, नूतन यात्रा कमिटीमधील सदस्य प्रशांत पाटील, राहुल सूर्यवंशी, रामदास भंडारे, आलम मुलानी, प्रमोद उदगावे, निखिल पाटील, संग्राम शिंदे, राजेश शिरगावे, अमोल उदगावे, जावेद खतीब, सतीश चौगुले यांनी संगनमत करून बेकायदेशीररित्या जीर्णोद्धार समिती स्थापन केली आहे. या  समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांना निवडले आहे. त्यामुळे गावात वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून चालू वर्षाची यात्रा कोणत्या मंडळाने करायची यावरून वाद निर्माण झाला होता. सदर वाद हा तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याकडे गेल्यानंतर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या मनाने आम्ही विरोधी गटाला यात्रा व मंदिर कलेस्थापना करण्यास संमती दिली होती. मात्र याचा गैरफायदा घेत, गावातील लोकांना विश्वासात न घेता कोणतीही दवंडी किंवा मीटिंग न घेता चुकीच्या पद्धतीने कलर समितीची स्थापना करून अध्यक्षाची निवड केल्याने गावातील लोकांमध्ये चीड निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बेकायदेशीरित्या स्थापन केलेल्या कलशारोहन समितीला आमचा विरोध असून गावातील बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत. गावामध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या स्थापन केलेली स्वयंघोषित अध्यक्ष व समिती रद्द करून पूर्वीप्रमाणे असलेली समिती कायम करण्यात यावी.
           निवेदनावर मूळ जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष कल्लाप्पा खवाटे,  जयपाल शिरगावे, रामगोंडा पाटील, अरुण आंबोळे, सचिन खोबरे, सागर मगदूम, राजकुमार कोगनोळे, राजकुमार ढेकळे, अभय गुरव, संतोष पाटील, सूर्यकांत उदगावे, पोपट चौगुले, विश्वास कांबळे, बाळासो बंडगर, यांच्यासह ८० हुन अधिक नागरिकांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिरटीत ग्रामदैवत श्री भैरेश्वराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

गुलाल-खोबऱ्याची उधळण : भैरेश्वराच्या नावानं चांगभलचा गजरशिरटी ता. शिरोळ येथील ग्रामदैवत श्…