Home राजकारण शेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव

शेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव

3 second read
0
0
2,300

१९ एप्रिल २०२४
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचे राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथे उत्स्फूर्त स्वागत झाले. गावकऱ्यांनी शेळेवाडी फाटा ते म्हसोबा मंदिरपर्यंत त्यांची जीपमधून मिरवणूक काढली. जेसीबीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगुले हे प्रचार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. राधानगरी तालुक्यात शाहू छत्रपतींना उंच्चांकी मतदान देऊ. असे हिंदुराव चौगुले यांनी सांगितले. तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, म्हणाले “आमदार प्रकाश आबिटकर यांना सगळी सत्ता आपल्या घरात राबवायचु आहे. स्वतः आमदार, भाऊ जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक.

मात्र आबिटकरांच्याकडून राधानगरी आणि भुदरगड तालुक्याचा विकास झाला नाही. हिंमत असल्यास त्यांनी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली ही जाहीरपणे सांगावे.” राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, नेते ए.वाय.पाटील, गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, सदाशिवराव चरापले, , जनता दलाचे वसंतराव पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंदरे, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे, सजेऺराव कांबळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सुरेश चौगुले, गोपाळराव निकम, कॉमेड सतीश कांबळे, शेकापचे दत्ता पाटील, जयसिंग पाटील, गीता पाटील, अवधूत पाटील, रंगराव पाटील, विनोद पाटील, सुशिल पाटील कौलवकर, प्रवीण पाटील, संतोष मेंगाणे, वैभव पाटील, बी.एस.पाटील आदी उपस्थित होते. निरीक्षक मधुकर रामाने उपस्थित होते. प्रचार मेळाव्याला नागरिकांची गर्दी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…