Home राजकारण कोल्हापूरसाठी ४२ तर हातकणंगलेसाठी ५५ उमेदवारी अर्ज दाखल ; आज छाननी

कोल्हापूरसाठी ४२ तर हातकणंगलेसाठी ५५ उमेदवारी अर्ज दाखल ; आज छाननी

3 second read
0
0
235

२०एप्रिल २०२४

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १३ उमेदवारांनी 14 नामनिर्देशन पत्र दाखल केले. या मतदारसंघासाठी आतापर्यंत एकूण 28 उमेदवारांचे 42 अर्ज दाखल झाले. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 16 उमेदवारांनी 22 नामनिर्देशनपत्र दाखल केले. या मतदारसंघात आता पर्यंत एकूण 36 उमेदवाराचे 55 अर्ज दाखल झाले.

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या चार दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरूय. शुक्रवारी अखेरच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 13 उमेदवारांनी 14 नामनिर्देशनपत्र दाखल केलेत. यामध्ये माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बाजीराव खाडे यांचा समावेश आहे. बाजीराव खाडे हे गेल्या काही महिन्यांपासून मतदार संघात संपर्क अभियानाच्या माध्यमातून कार्यरत होते. गेली अठ्ठावीस वर्षे आपण काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत असून देखील आपल्यावर अन्याय झाल्याचं त्यांनी सांगितलं. स्वाभिमानी कार्यकर्त्याचा आवाज दबला जाऊ नये यासाठी आपण या निवडणूक रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…