Home एंटरटेनमेंट अखेर नवरदेवाशिवाय पार पडलं लग्न! सप्तपदी घेत बांधली स्वतःशीच लग्नगाठ….

अखेर नवरदेवाशिवाय पार पडलं लग्न! सप्तपदी घेत बांधली स्वतःशीच लग्नगाठ….

3 second read
0
0
76

गुजरातच्या क्षमा बिंदूने बुधवारी स्वतःशी लग्न केले.
क्षमाने याआधी ११ जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती, मात्र वाद टाळण्यासाठी तिने ठरलेल्या तारखेच्या ३ दिवस आधी स्वतःशी लग्न केले आहे.


क्षमा बिंदूने शेवटी स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले आणि एका खास विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
लग्नादरम्यान हळदीचे विधी झाले, मेहेंदी झाली, सप्तपदी झाली.
वडोदरा येथील गोत्री येथील घरात क्षमाने रितीरिवाजानुसार लग्न केले. मात्र, या लग्नात नवरदेव किंवा पंडित नव्हते.
क्षमाच्या काही खास मित्रांनीही या लग्नाला हजेरी लावली होती
भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे.
क्षमाने यापूर्वी ११ जून रोजी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तेव्हापासून तिच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती. याबाबत तिच्या शेजाऱ्यांनीही विरोध केला होता
तिने ठरलेल्या तारखेपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण तिला भीती होती की कोणीतरी ११ जून रोजी तिच्या घरी येऊन वाद निर्माण करेल.
तिला तिचा खास दिवस खराब करायचा नव्हता. क्षमाने आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप नेत्याच्या विरोधानंतर तिने घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पंडितजींनी लग्नाचे विधी करण्यासही नकार दिला. म्हणून क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…