Home आरोग्य शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर प्रो. डॉ. साताप्पा सावंत यांची अध्यक्षपदी निवड

शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर प्रो. डॉ. साताप्पा सावंत यांची अध्यक्षपदी निवड

2 second read
0
0
57

विलिंग्डन कॉलेज सांगली येथील हिंदीचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. साताप्पा शामराव सावंत यांची शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर अध्यक्षपदी निवड झाली आहे.प्रो. डॉ. सावंत विलिंग्डन कॉलेज सांगली येथे गेली 31 वर्षे अध्यापन करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली ५ विद्यार्थ्यांनी पीएच. डी पदवी प्राप्त केली आहे, तर ५ विद्यार्थ्यांनी एम. फिल पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ७ समीक्षात्मक ग्रंथ लेखन केले आहे तर २ भाषांतरित पुस्तके त्यांचे नावावर आहेत.

त्यांनी यूजीसी कडून एक मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. त्यांनी ६० पेक्षा अधिक ठिकाणी आपले शोधनिबंध सादर केले आहेत तितकेच शोधनिबंध प्रकाशितही झाले आहेत. विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, संस्थेचे आजीव सेवक डॉ. आर. ए. कुलकर्णी, प्रा. आर. जे. पाटील, संस्थेचे कॉन्सिल मेंबर डॉ. विश्राम लोमटे, श्री रामकृष्ण पटवर्धन, कॉलेजचे सर्व प्राध्यापकानी प्रो. डॉ. साताप्पा शामराव सावंत यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …