दख्खनचा राजा जोतिबाची काल पाच एप्रिल 2023 रोजी चैत्र यात्रा वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविकांच्या उपस्थिती पार पडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी गर्दी असते. या चैत्र यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक तसेच आजूबाजूच्या राज्यातून अंदाजे १५ लाख भाविक उपस्थित राहिल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. गुलालाची उधळण, जोतिबाच्या नावानं चांगभलं चा गजर जोश आणि जल्लोषाचे भक्तीमय वातावरणात …