Home Uncategorized मलकापूर अतिक्रमण मुक्त होणार ?

मलकापूर अतिक्रमण मुक्त होणार ?

10 second read
0
0
490

मलकापूर प्रतिनिधी   

  मलकापूर शहर बाजारपेठेतील वाहतूक कोंडीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे संबंधितानी ८ दिवसात  तात्काळ काढून घ्यावी, जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही. अन्यथा पालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचा इशारा मलकापूर नगर परिषदेच्या प्रशासक विद्या कदम यांनी नरहरी मंदिर मलकापूर येथे आयोजित बैठकी प्रसंगी सांगितले. बैठकीस मोजकेच व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.   

  मलकापूर शहरातील वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग काढण्यासाठी शहरातील व्यापारी, नागरिक व पदाधिकारी यांच्यासमवेत नरहरी मंदिर मलकापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, दरम्यान शहराचा वाहतुकीचा गंभीर प्रश्न, त्याबरोबरच बाजारपेठेचे वैभव टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक असताना देखील अगदी कमी संख्येने नागरिक, व्यापारी उपस्थित राहिल्याने तो देखील चर्चेचा विषय ठरला.  बाजारपेठेत वाढलेल अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, बाहेरून येणाऱ्या गाड्यांचे करावयाचे पार्किंग याबाबत बैठकीत बरीच चर्चा झाली. प्रत्येक व्यापारी व नागरिकांनी विविध समस्या, या ठिकाणी निर्माण होत असल्याची जाणीव प्रशासनाला करून दिली. प्रशासनानेच आता कठोर भूमिका घेऊन यावर मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या कठोर भूमिकेला नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील असे यावेळी बैठकीत उपस्थितांच्या वतीने सांगण्यात आले.   

 यावेळी बोलताना मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम म्हणाल्या की, बाजारपेठेत विठ्ठल मंदिर ते नगर परीषद  या मार्गावर असलेले अतिक्रमणे काढण्यासाठी संबंधितांना नोटीस दिली जाईल. ८ दिवसाची पूर्व सूचना दिली जाणार आहे. संबंधितानी सर्व अतिक्रमणे काढून घ्यावी, अन्यथा प्रशासन कारवाई करणार आहे. एकूण या सर्व कारवाईचा अहवाल तहसील कार्यालय, त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांना दिला जाणार असल्याचे ही यावेळी विद्या कदम यांनी स्पष्ट केल.     या बैठकीत आघाडी प्रमुख प्रकाश पाटील, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष विजय गांधी, बंधू कोठावळे, सुभाष पाथरे, सुशांत तांदळे, सुभाष कोळेकर, चेतन गुजर, महेश कोठावळे, स्वरूप गांधी, बाबू सोनावळे, रुपेश वारंगे आदींनी प्रश्न उपस्थित केले.      या बैठकीस मुख्याधिकारी विद्या कदम यांच्यासह, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, विकास देशमाने, नगरपरिषदेचे अधिकारी प्रसाद हर्डीकर, महेश गावखंडकर, प्रदीप पाटील, प्रकाश कांबळे, अमर आदींच्या सह व्यापारी नागरिक उपस्थित होते.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …