Home Uncategorized मलकापूर नगरपरिषद – अतिक्रमण कारवाई

मलकापूर नगरपरिषद – अतिक्रमण कारवाई

2 second read
0
0
435

मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर नगर परिषदेची अतिक्रमण विरोधी कारवाई आजपासून सुरू झाली. मलकापूर शहरातील व्यापारी, भाजीपाला विक्रेते, इतर विक्रेते यांना नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या नोटिसीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याने, आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी अतिक्रमण संदर्भात कारवाई करण्यात आली.

यामध्ये नगरपरिषद ते विठ्ठल मंदिर या ठिकाणी स्वतः मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांनी रस्त्यावर असणाऱ्या व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोटरसायकल, चार चाकी वाहने, बोर्ड, रस्त्यावरील पार्किंग, शेड, पाल या घटकांवर सूचना व कारवाई करण्यात आली.

दोन दिवसापूर्वी झालेल्या तहसीलदार कार्यालयाच्या बैठकीत, मलकापूर साठी पार्किंग ठिकाण श्री छत्रपती शिवाजी मैदान, जनावरांचा बाजार, मलकापूर नगर परिषदेच्या शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत दोन चाकी व चारचाकी वाहन पार्किंग करण्याची सूचना देण्यात आली होती पण, नगरपरिषदेकडून अजून त्या जागेवर शिक्कामोर्तब झालेला नाही.या अतिक्रमण पथकामध्ये मुख्य अधिकारी तथा प्रशासक विद्या कदम, जयश्री देवकुळे, प्रदीप पाटील, विनोद तंवर, प्रकाश कांबळे, दीपक सनगर, अमर पाटील, शाहिद मिस्त्री, आकाश आरळेकर, ट्राफिक पोलीस सुयश पाटील व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …