Home Uncategorized गोकुळ दूध संघाची शिरोळ तालुका संपर्क सभा संपन्‍न – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ )

गोकुळ दूध संघाची शिरोळ तालुका संपर्क सभा संपन्‍न – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ )

1 min read
0
0
649

शिरोळ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघामार्फत कल्पवृक्ष सांस्कृतिक भवन उदगाव ता.शिरोळ येथे संघाशी सलग्न शिरोळ तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा घेण्यात आली यावेळी सॅटेलाईट डेअरी उदगाव येथील संघाच्या पाणी पुरवठा योजनचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व शरद साखर कारखान्याचे संचालक आदित्य राजेंद्र यड्रावकर यांच्‍या हस्‍ते तसेच संघाच्या संचालक मंडळाच्या उपस्थित झाले.

      यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि पुणे व मुंबई बाजार पेठेत गोकुळच्‍या म्‍हैस दुधाला मागणी जास्‍त असून या अनुषंगाने संघाकडून म्‍हैस दूध वाढ कार्यक्रम राबिविले जात आहेत तरी दूध उत्‍पादकांनी म्‍हैस दूध वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत त्‍यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन संघाकडून केले जाईल. गोकुळच्‍या दूध उत्‍पादकांनी संघामार्फत राबवलेल्‍या विविध योजनांचा लाभ घेऊन म्‍हैस दूध उत्‍पादन वाढीवर भर द्यावा ज्‍यामुळे वीस लाख लिटर्स दूध संकलनाचे उदिष्ट साध्य होईल असे मनोगत व्यक्त केले तसेच संस्था प्रतिनिधी विचारलेले प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले दूध संकलन केंद्रावर खरेदी-विक्री करता दहा ग्रॅम अचूकतेची इलेक्ट्रॉनिक वजन काटे वापरण्यासंबंधीचा निर्णयास स्थगिती मिळवण्यासाठी व नाबार्डची योजना (जनावरे खरेदी कर्ज प्रकरणे) योजना शासनाकडे पुन्हा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले .

      यावेळी बोलताना आदित्य यड्रावकर म्हणाले शिरोळ तालुक्याला गोकुळचे नेहमीच सहकार्य राहिले आहे.विशेषता महापुराच्या काळात सर्वसामान्‍य दूध उत्‍पादकांना उभे करण्‍याचे काम गोकुळ दूध संघाने केले आहे. भविष्‍यातही असेच सहकार्य गोकुळ दूध संघामार्फत शिरोळ तालुक्‍याला राहो असे मनोगत व्‍यक्‍त केले.

यावेळी स्‍वागत संचालक सुजित मिणचेकर यांनी केले. तर आभार संचालक बाबासाहेब चौगले यांनी मानले तसेच संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्‍या सत्‍कार श्री.दरगोबा दूध संस्‍थेचे चेअरमन आप्‍पासो गावडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.तसेच प्रमुख पाहूणे आदित्य यड्रावकर यांचा सत्‍कार संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.उपस्थित सर्व संचालकाचा सत्‍कार शिरोळ तालुक्‍यातील विविध दूध संस्‍थेच्‍या चेअरमन व संचालक यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.तसेच पाणी पुरवठा योजनेस सहकार्य करणारे शामराव बंडगर, बाळासाहेब तुरंबे, बाप्पा इंजिनिअर्स, पाटबंधारे विभाग यांचा सत्कार चेअरमनसो यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण व दुध बिल या विभागावर सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसण करण्‍यात आले .

याप्रसंगी चेअरमन अरूण डोंगळे, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर,बाळासो खाडे, अबरिशसिंह घाटगे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व संघाचे अधिकारी तसेच शिरोळ तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन ,संचालक,प्रतिनिधी,दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…