Home शेती ‘गोकुळश्री’ च्या स्पर्धेत सौ.अर्चना खांडेकर यांची म्‍हैस प्रथम तर सरवडेचे श्री. शांताराम साठे यांच्या गायीस प्रथम क्रमांक प्राप्‍त…!

‘गोकुळश्री’ च्या स्पर्धेत सौ.अर्चना खांडेकर यांची म्‍हैस प्रथम तर सरवडेचे श्री. शांताराम साठे यांच्या गायीस प्रथम क्रमांक प्राप्‍त…!

1 min read
0
0
168

गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते, सन २०२२-२३ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ८० म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक २३/११/२०२२ रोजी घेण्‍यात आली असून, त्‍यामध्‍ये अरुंधती महिला सह.दूध व्‍याव. संस्‍था लिंगनूर क.नूल ता. गडहिंग्‍लज म्‍हैस उत्‍पादक सौ.अर्चना उमेश खांडेकर यांच्‍या म्‍हैशीने एका दिवसात २०.१४० लि. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गाईंमध्ये मा.आम.कै.किसनराव मोरे सह.दूध व्‍याव.संस्‍था सरवडे ता.राधानगरी येथील गाय उत्‍पादक श्री. शांताराम आनंदा साठे यांच्‍या गायीने ३५.०८०लि. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.गोकुळशी संलग्‍न असणा-या सर्व प्रथमिक दूध संस्‍थांच्‍या सभासदां करीता या स्‍पर्धा प्रतिवर्षी घेण्‍यात येतात. ‘गोकुळश्री’स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे,जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये दूध उत्‍पादन वाढवणे याचबरोबर दुग्‍ध व्‍यवसायामधुन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत-जास्‍त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्‍यवसायकडे आकर्षित करून दूध व्‍यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्‍पर्धा गोल्‍या २९ वर्षापासून आपल्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये सुरू केलेली आहे.या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्‍यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्‍पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन मा.श्री.विश्वासराव पाटील यांनी केले आहे. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशिल असल्‍याचे दिसून येते असे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी यावेळी नमूद केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…