Home Uncategorized प्रा.डॉ.एन डी पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

प्रा.डॉ.एन डी पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

2 second read
0
0
68

महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व सर्व विद्यार्थी यांनी मंगळवार दिनांक ०५/०९/२०२३ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व थोर तत्त्वज्ञानी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत करताना कुमारी कविता लोखंडे हिने शिक्षक दिनाचे व शिक्षकाचे विद्यार्थी घडवण्यामध्ये महत्व व्यक्त केले.

महाविद्यालयातील विद्यार्थी कु. स्नेहल माने, कु. सोनाली मोरे, प्रवीण घुगे,साहिल कुंभार व साद महंमद सय्यद इत्यादी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्रो.डॉ.खोत एस. के., प्रा.डॉ.कांबळे एन. के.प्रा. सुतार आर.एस.,प्रा.चिखलीकर बी. एस. उपप्राचार्य, डॉ.एन.एस.आडनाईक व प्रो.इंगळे जे.एस. यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले .
महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.टी.एन. घोलप यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यानी कृतीशील, शिलवान व जबाबदार भारतीय नागरिक बनण्याचे विद्यार्थ्याना अवाहन केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सोनाली मोरे व आभार कुमार विनायक पाटील यांनी मानले.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …