Home Uncategorized खा. मानेंनी मंजूर केलेला निधी व विकास कामांबद्दल चुकीचा गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न…

खा. मानेंनी मंजूर केलेला निधी व विकास कामांबद्दल चुकीचा गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न…

3 second read
0
0
1,299

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवाराकडून विकास कामांबद्दल मतदारसंघात संपर्क दौरा व प्रचार सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खा. धैर्यशील माने यांनी आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये हातकणंगले मतदार संघासाठी एकूण 8200 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. त्यांनी मंजूर केलेला निधी व केलेली कामे याची माहिती असलेले डिजिटल बोर्ड संपूर्ण मतदारसंघातील गावोगावी लावण्यात आले आहेत, सोबतच त्या डिजिटल बोर्डवर एक क्यू आर कोड देण्यात आलेला आहे. ज्या क्यूआर कोड च्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली प्रत्येक गावासाठी मंजूर केलेला निधी व निधीतून पूर्ण होणारी कामे याची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर मंजूर केलेला निधी व विविध विकास कामे यांची पीडीएफ त्या ठिकाणी संलग्नित करण्यात आले होते. मात्र काही टेक्निकल त्रुटींमुळे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर वेगळी वेबसाईट ओपन होत असल्याने, तो क्यू आर कोड फेक असल्याचे काही गैरकृत्य करणाऱ्या लोकांनी नागरिकांमध्ये पसरवले आहे.

मात्र सत्य परिस्थिती ही वेगळीच आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर चुकीची माहिती दिसणे किंवा वेगळीच वेबसाईट ओपन होणे हा टेक्निकल त्रुटीचा भाग असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी खा. माने यांनी केलेली विकास कामे व मंजूर केलेला निधी हा वास्तविकता खरा आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये पसरवलेला हा एक चुकीचा गैरसमज असल्याचे दिसून येते. सुरुवातीची तीन वर्ष करोना महामारीमुळे विकास कामे करण्यासाठी फंड आला नव्हता, पण पुढील दोन वर्षात खासदार माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इतिहासात पहिल्यांदाच सर्वात जास्त निधी आणून विकास कामे केल्यामुळे विरोधकांना खासदार माने यांच्यावरती टीका करण्यासाठी काही उरले नसल्याचे दिसून येते.

एकंदरीत राजकीय विरोधकांकडून अशी चुकीची माहिती पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचे व खा. माने यांचा अपप्रचार करण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…