Home Uncategorized प्राचार्य प्रो.डॉ.ए.एम.शेख यांची श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, येलूर यास सदिच्छा भेट

प्राचार्य प्रो.डॉ.ए.एम.शेख यांची श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, येलूर यास सदिच्छा भेट

3 second read
0
1
140

मलकापूर प्रतिनिधी:

दि.१६. मार्च २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगरचे प्राचार्य शेख सरांनी श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर याठिकाणी सदिच्छा भेट दिली. सोबत समन्वयक श्री.भालचंद्र शेटे व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य.व्ही.एस.पाटील सर उपस्थित होते. सुत्रसंचलन व प्रास्ताविक जेष्ठ प्रा.पी.बी.बंडगर यांनी केले.

प्राचार्य ए. एम.शेख सरांचे स्वागत समन्वयक श्री.भालचंद्र शेटे सरांनी केले.स्वागत मनोगतामध्ये प्र.प्रा.व्ही.एस.पाटील सर यांनी केले. स्वागत पर मनोगतामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय,भारत सरकार, नवी दिल्ली (केंद्र सरकार)च्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) या योजनेतून पाच कोटी (५) अनुदान मिळविण्यासाठी देशातील ३२१ महाविद्यालयाची निवड करण्यात आली यामध्ये श्री यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयास स्थान मिळवून पाच कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. यामुळे वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्या शिर्केसामध्ये पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच वारणा महाविद्यालय वारणानगरला अलीकडेच नॅक अ+ मानांकन प्राप्त झाले बद्धल अभिनंदन केले.यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर चे प्राचार्य शेख सरांनी वारणा महाविद्यालयाच्या वतीने श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर यास सर्व प्रकारच्या अडचणीत सहकार्य करण्याचे, व या महाविद्यालयाच्या पाठीशी राहण्याचेआश्वासन दिले.

त्याचबरोबर वारणा शैक्षणिक पॅटर्न शाहुवाडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांपर्यंत पोहोचवून सदर विभागातील महिलांचे जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही वारणा विभाग शिक्षण मंडळ व यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय यांच्या वतीने दिली.या महाविद्यालयाच्या जडणघडणीत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनयरावजी कोरे साहेब(सावकार) यांचे बारीक लक्ष आहे, शोभाताई कोरे महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये प्रयत्नशील आहेत हे सर्वांच्या नजरेत आणून दिले.तसेच या महाविद्यालयास सर्वोतोपरी मदत करणार असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे शेवटचे आभाराचे पुष्प प्रा.आर.एस.पाटील यांनी केले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्याशाखेतील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …