Home Uncategorized कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील उमेदवारीस विलंब कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता…

कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील उमेदवारीस विलंब कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता…

2 second read
0
0
869

कोल्हापूर : ता. 23 मार्च

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मुंबईत तळ ठोकून असून, धैर्यशील माने हे मात्र मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.


महायुतीकडून मंडलिक आणि माने या दोघांचीही नावे असल्याचे सांगण्यात येते. या दोघांची उमेदवारी निश्चित मानली जाते. परंतु एकूणचभाजपच्या उमेदवारी जाहीर करण्यातील धक्कातंत्रामुळे जोपर्यंत दिल्लीतून नावांची घोषणा होत नाही, तोपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नाही, ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापुरात अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी उमेदवारीबाबत फारसे भाष्य न करता महायुती जो उमेदवार त्याच्या विजयासाठी परिश्रम करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या.


केके न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिरटीत ग्रामदैवत श्री भैरेश्वराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

गुलाल-खोबऱ्याची उधळण : भैरेश्वराच्या नावानं चांगभलचा गजरशिरटी ता. शिरोळ येथील ग्रामदैवत श्…