Home राजकारण कोल्हापुरात सलून व्यावसायिकही लोकसभेच्या आखाड्यात, सायकलवरून येत दाखल केला अर्ज

कोल्हापुरात सलून व्यावसायिकही लोकसभेच्या आखाड्यात, सायकलवरून येत दाखल केला अर्ज

3 second read
0
0
989

१८ एप्रिल २०२४

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झुंबड उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (18 एप्रिल) कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी चक्क सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोल्हापूर शहरातील पंचगंगानदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना कोणत्याही राजकीय नेत्यानं कोल्हापूरच्या प्रदूषणाचा प्रश्न गांभीर्यानं घेतला नाही. त्यामुळं कोल्हापुरातील प्रदूषणाच्या समस्येकडं सर्वांचं लक्ष जावं, या अनुषंगानं अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ यांनी सायकलवरून प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केला. संदीप संकपाळ यांनी यापूर्वी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून अनुक्रमे 10 हजार 963 आणि साडे सहा हजारांचं मतदान मिळवलं होतं. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी सलून व्यावसायिक असलेले 43 वर्षीय संदीप संकपाळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात सायकलवरून आले, पर्यावरणाला कोणतंही नुकसान पोहोचू नये यासाठी आपण सायकलनं प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कोल्हापूरकरांनी आपल्या मतांचं दान टाकून मला विजयी करावं असं आवाहनही यावेळी संकपाळ यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…