Home Uncategorized लोकसभा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात.. नेमक्या निवडणुका कधी होणार..?

लोकसभा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात.. नेमक्या निवडणुका कधी होणार..?

3 second read
0
0
516

लोकसभा निवडणुक 2024 कधी होणार, नेमक्या कोणत्या तारखेला निवडणूक पार पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय मंडळी आणि निवडणुक आयोग यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे.

विविध राज्याचे दौरे करून निवडणूक आयोगाचे अधिकारी पाहणी करत आहेत, अधिकाऱ्यांचे हे दौरे 12 मार्च पर्यंत पूर्ण होतील, अशी शक्यता आहे. त्यानंतर 13 मार्चनंतर कधीही लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची ही तयारी आता अंतिम टप्यात आल्याने सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करताना दिसत आहेत. येत्या लोकसभा निवडणुका 7 ते 8 टप्यात होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. तर महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटप 27 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. पण अद्यापही निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नसल्याने, सर्वांना निवडणुका कधी होणार?? याची आतुरता लागून राहिली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…