Home Kolhapur वन्य प्राण्यांसाठी वनराई बंधाऱ्यांची सोय

वन्य प्राण्यांसाठी वनराई बंधाऱ्यांची सोय

3 second read
0
1
68

२०एप्रिल २०२४

राधानगरी तालुक्यामध्ये वन्यप्राण्याची संख्या लक्षणीय असून गवा या वन्यप्राण्यांबरोबरच ससा, बिबट तरस, कोल्हा इतर वन्य‌प्राणी जंगल क्षेत्र सोडून गाव वस्तीत व शेतकऱ्यांच्या खाजगी क्षेत्रात शिरून शेतकरी वर्गाने पिकविलेल्या विविध पिकांची नासधुस करीत आहेत. दाजीपूर अभयारण्य हे गव्यासाठी राखीव् असून देखील गवा वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिवसाही दिसून येत आहे.

सदरचे वन्यप्राणी सद्या जंगल क्षेत्रातील नैसर्गिक झरे आटल्याने व चाऱ्याची कमतरता असल्याने मानवी वस्तीकडे गवे येत आहेत. तसेच जंगलातील नैसर्गिक ओढ्यां- नाल्याना मार्च-एप्रिल अखेर राहनारे पाणी संपले असून मागील दोन वर्षमिच्चे श्रमदानातून केलेले वनराई बंदारे देखील कोरडे पडलेले आहेत तसेच जंगल क्षेत्रात् अज्ञात व्यक्तीनी केलेल्या वण वनव्यामुळे देखील ओढे, नाले, द्वारे कोरडे पडलेले आहेत वनव्यामुळे वन्यप्राण्यांना उपलब्ध होणारा चारा नष्ठ होऊन पाणी देखील आटून जात आहे.
तसेच् मा. श्री. विशाल पाटील (वनक्षेत्रपाल राधानगरी) यांचे मार्गदर्शनाखाली . सरिता पाटीक (वनरक्षक ऐनी) यांनी स्वतः विशेष परिश्रम करून ऐनी जंगल कक्ष -मध्ये वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणेकामी वनराई बंधारे घातलेले आहेत. सदरचे वनराई बंधारे घालनेकामी गुंडू दळवी, . बळवंत पाटील (वनमजूर यांनी परिश्रम घेतले .सदर कामाची दखल ऐनि ग्रामस्थांनी देखील घेतलि असून ऐनी ग्रामस्थामधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…